Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; विमान जळून खाक |VIDEO पाहा

Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; विमान जळून खाक |VIDEO पाहा

ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. 62 प्रवाशांना घेऊन जाणारं एक विमान कोसळल्यांने मोठी खळबळ उडाली आहे.
Published by :
shweta walge
Published on

ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. 62 प्रवाशांना घेऊन जाणारं एक विमान कोसळल्यांने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 58 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत. विमान दुर्घटनेचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचं एटीआर-७२ हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं. शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी पावणे दोनच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही दुर्घटना घडली आहे. साओ पाऊलो राज्य अग्निशमन दलाने समाजमाध्यमांद्वारे या वृत्ताची पुष्टी केली आहे. विमान ज्या भागात कोसळलं तिथे अग्निशमन दलाची पथकं व बचाव पथकं रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, एअरलाईन कंपनी वोपासने एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी विमान अपघाताच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ग्वारूलहोसला जाणारं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या विमानात एकूण ५८ प्रवासी होते. तसेच पायलटसह चार कर्मचारीदेखील या विमानात होते. विमान कंपनीने निवेदन जारी केलं असलं तरी ही विमान दुर्घटना कशामुळे झाली ते अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com