Booster Dose
Booster DoseTeam Lokshahi

देशात आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरूवात; वाचा कोण असेल बूस्टरसाठी पात्र

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Central Health Ministry) घोषणा करण्यात आली आहे की, आजपासून (10-4-2022) कोविड वॅक्सिनचा बूस्टर (Covid Booster Vaccine) डोस देण्यात येणार आहे
Published by :
Vikrant Shinde
Published on

बूस्टर डोससाठीच्या अटी:

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Central Health Ministry) घोषणा करण्यात आली आहे की, आजपासून (10-4-2022) कोविड वॅक्सिनचा बूस्टर (Covid Booster Vaccine) डोस देण्यात येणार आहे. ज्या भारतीय नागरीकांचे कोरोनाचे दोन्ही डोस 9 महीन्यांआधी घेतले आहेत त्यांना आजपासून हा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून अशी घोषणा करण्यात आली आहे की, 'ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.'

लसींच्या किंमतीत घट:

दरम्यान, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन (Covishield & Covaxin) ह्या दोन्ही लसींच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. सीरमने (Syrum Institue) खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे या वॅक्सिनचे दर हे तब्बल 375 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आधी 600 रुपयांना मिळत होती तर, आता 225 रुपयांना मिळणार आहे. सोबतच भारत बायोटेकने (Bharat B देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता 1200 वरून थेट 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com