Fitness Trainer: 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू
इंडोनेशियाचा बॉडीबिल्डर आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर जस्टीन विकीचा जीममध्ये वजन उचलताना दुर्दैवी मृत्यू झाला. विकी 15 जुलैला इंडोनेशियामधील बाली येथील एका जीममध्ये वर्कआऊट करत होता. त्यावेळी 210 किलो वजनाचा बारबेल त्याच्या मानेवर पडल्याने त्याची मान जागीच तुटली. हृदय आणि फुफ्फुसांशी जोडलेल्या नसा दबल्याने जस्टिनचा काही वेळातच मृत्यू झाला. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चॅनल न्यूज एशियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना 15 जुलै रोजी घडली. जस्टिन विकी केवळ 33 वर्षांचा होता. वर्कआउट दरम्यान 210 किलो वजनाचा बारबेल त्याच्या मानेवर पडल्याने त्याची मान जागीच तुटली.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जस्टिन विकी पॅराडाईज बाली जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना दिसत आहे. स्क्वॅट्स करताना त्याला सरळ उभे राहता येत नव्हते. तोल गेल्याने तो पुन्हा खाली बसला.