शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल

शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल

शिर्डीच्या साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद हायकोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहेत. दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे असे देखिल हायकोर्टाने सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिर्डीच्या साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद हायकोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहेत. दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे असे देखिल हायकोर्टाने सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यापासून औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी सुरु होती. अखेर आज औरंगाबाद कोर्टाने शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थान च्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातून सभासद नेमण्यात येतात.

सहा महिन्यापूर्वी शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. मात्र तेव्हापासूनच या विश्वस्त मंडळाला विरोध करण्यात येत होता. साई बाबा मंदिर संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार हे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात यात होता. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ नेमल्यापासून येथील उत्तरामराव शेळके यांनी औरगांबाद खंडपीठात धाव घेत याबाबत याचिका दाखल केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com