मुंबई - गोवा महामार्गावर आज, उद्या 'या' वेळेत ब्लॉक घेतला जाणार

मुंबई - गोवा महामार्गावर आज, उद्या 'या' वेळेत ब्लॉक घेतला जाणार

मुंबई - गोवा महामार्गावर आज, उद्या ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबई - गोवा महामार्गावर आज, उद्या ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी १८ आणि शुक्रवारी १९ जुलै रोजी चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोलाडजवळील पुई येथे नवीन पुलाचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पुलाचे गर्डर टाकण्यासाठी हा 4 तासांचा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवस दुपारी बारा ते सायंकाळी चार या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकच्या या कालावधीत महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार असून याबाबत वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com