अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे मुरजी पटेल उद्या उमेदवारी अर्ज भरणार
Admin

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे मुरजी पटेल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाचे नेते मुरजी पटेल उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाचे नेते मुरजी पटेल उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज सकाळी 9 वाजता शेरे-पंजाब ग्राउंडमधून आपल्या पंधरा ते वीस हजार समर्थकांच्या सोबत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली.

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.

अंधेरी पूर्व मतदारसंघ भाजप लढवणार की शिंदे गट याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. मुरजी पटेल यांनी या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. ही जागा जर भाजपकडे गेली तर तेच उमेदवार असतील. तर ही जागा शिंदे गट लढवणार असेल तर ते शिंदे गटाचे उमेदवार होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे मुरजी पटेल उद्या उमेदवारी अर्ज भरणार
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com