BJP Protest
BJP ProtestTeam Lokshahi

लोकसभा निवडणूक : समाजवादीच्या बालकिल्ला आझमगडमध्ये भाजप विजयी

रामपूरनंतर आझमगडमध्येही सपाचा बालेकिल्ला ढासळला आहे. रामपूरमधून भाजपचे दिनेश लाल निरहुआ यांनी ११२१२ मतांनी विजय मिळवला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

Azamgarh Election : रामपूरनंतर आझमगडमध्येही सपाचा बालेकिल्ला ढासळला आहे. रामपूरमधून भाजपचे दिनेश लाल निरहुआ यांनी ११२१२ मतांनी विजय मिळवला आहे. रामपूरमध्ये भाजपचे घनश्याम लोधी जवळपास 42 हजार मतांनी विजयी झाले आहेत. घनश्याम यांनी सपाच्या अझीम रझा यांचा ४२ हजार मतांनी पराभव केला. आझमगडमध्येही भाजपचे निरहुआ विजयी झाले आहेत.

BJP Protest
Sanjay Raut : 40 आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील, राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य

उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर या दोन लोकसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. एकीकडे त्यांनी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमध्ये दिनेश लाल यादव उर्फ ​​निरहुआ यांना विजय मिळवून दिला आहे, तर दुसरीकडे आझमचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या रामपूरमध्येही त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. रामपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने चौथ्यांदा विजय मिळवला आहे. आझम खान यांचे समर्थक असलेले सपा उमेदवार मोहम्मद असीम रझा यांना केवळ 3 लाख 25 हजार मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार घनश्याम लोधी यांना 3 लाख 67 हजार मते मिळाली.

BJP Protest
शिंदे गटातील आमदारांच्या घराबाहेर केंद्राकडून 'Y+' सुरक्षा

रामपूर लोकसभा जागेवर भाजपच्या विजयामागे बसपाच्या मतांचे विभाजन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. 2019 मध्ये सपा आणि बसपने एकत्र निवडणूक लढवली आणि ही जागा सपाच्या खात्यात गेली. मात्र त्याआधी 2014 मध्ये भाजपचे दिवंगत नेते डॉ.नेपाल सिंह विजयी झाले होते. त्यानंतर बसपा आणि काँग्रेसनेही मुस्लिम उमेदवार उभे केल्याचे बोलले जात होते आणि त्यामुळे सपाचा पराभव झाला. यावेळी बसपा आणि काँग्रेसने उमेदवार दिले नाहीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com