हरियाणात भाजपची विजयाची हॅट्रीक
दुसरीकडे भाजपच्या मुंबई कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळते आहे.हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र दिसत आहे. मतमोजणीच्या प्रारंभिक फेऱ्यात भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली. त्यानंतर आता भाजपला 90 पैकी 50 जागांवर आघाडी आहे. 2024 पासून दोन वेळा भाजपाने हरियाणामध्ये सत्ता मिळवली. मात्र, दशकभरात भाजपाविरोधात रोष निर्माण झाल्याचे बोलले जात होते. काँग्रेसनेही आक्रमक प्रचार करत भाजपाला कडवी झुंज दिली होती. एग्झिट पोल्सनेही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्ट बहुमत पडेल, असे सांगितले होते. मात्र आता भाजपाने विजयाची हॅट्रीक साधली आहे.
दुसरीकडे भाजपच्या मुंबई कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळते आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेत्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळत आहे.