'उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी सौदा' फोटो शेअर करत भाजपचा गंभीर आरोप
थोडक्यात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला रंगत येत असून, प्रत्येक पक्ष प्रचारामध्ये सक्रिय आहे.
भाजपच्या अधिकृत अकाऊंटवर हिंदुत्व सोडलं असल्याचं ट्विट करत एक फोटो शेअर केला गेला, ज्यात उद्धव ठाकरे आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची भेट दाखवण्यात आली.
या ट्विटमध्ये आरोप करण्यात आले की उद्धव ठाकरे यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी सौदा केला असल्याच म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला रंगत येत आहे. कारण प्रचारांचा तोफा सुरु झाल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहेत. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणीसा सुरुवात झाली आहे. यातच आता भाजपच्या अधिकृत अकांऊटवर उबाठांनी सत्तेसाठी हिंदुत्त्व सोडलं असल्याच ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. त्यांनी उध्दव ठाकरेंशी एक सौदा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काय आहे भाजपच ट्विट?
उबाठांनी सत्तेसाठी हिंदुत्त्व सोडलं याचा आणखीन एक पुरावा पहा. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जनाब उध्दव ठाकरे यांच्यातलं सख्य महाराष्ट्रापासून लपलेलं नाही. नुकताच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. त्यांनी देखील उध्दव ठाकरेंशी एक सौदा केला आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या बदल्यात जनाब उध्दव ठाकरेंनी या बोर्डाच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.
१. संसदेत वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकास विरोध करणार
२. महाविकास आघाडीकडून अधिकाधिक मुस्लिम उमेदवार निवडून आणणार
सत्तांध झालेल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्राचा सौदाच करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचा ऑल इंडिया उलमा बोर्डाशी केलेला सौदा आणि आता उबाठांचा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी केलेला सौदा महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जाईल. राज्यात अराजकता पसरणार. त्यामुळे मतदारांनो सावधान…