उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन; काय झाली चर्चा, सांगितले...

उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन; काय झाली चर्चा, सांगितले...

केंद्रीय निवडणूक आयागोने शिवसेनेचे पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

केंद्रीय निवडणूक आयागोने शिवसेनेचे पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यावरुन आरोप - प्रत्यारोप होत आहेत. भाजपा नेत्या पकंजा मुंडे यांनीही उद्धव ठाकरेंना या सर्व पार्श्वभूमीवर फोन केला होता, अशी माहिती मिळत आहे.

चिंचवड येथे पोटनिवडणूक प्रचाराला आल्या असताना माध्यमांसोबत त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आपण उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो आहे. मात्र काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही. एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. सत्तेत असल्याने आपल्यासोबत असलेल्यांना भविष्यात निवडून आणणं ही मोठी संधी शिंदे यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे नाव नसताना पुन्हा आपला पक्ष उभा करणं ठाकरे यांच्यासमोरचा प्रश्न आहे. पुढे काय घडतं याचं कुतूहल आपल्याला आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com