विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला शरद पवारांचा मोठा धक्का, बड्या नेत्यांचा पक्षात प्रवेश

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला शरद पवारांचा मोठा धक्का, बड्या नेत्यांचा पक्षात प्रवेश

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला.
Published by :
shweta walge
Published on

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला. सोनगाव (ता. राहुरी) येथील भाजपच्या पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.

आज (शुक्रवारी) राहुरी येथे आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा झाला. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व सोनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण अंत्रे, तालुका सरचिटणीस प्रशांत अंत्रे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र अनाप, ओबीसी आघाडीचे तालुका संघटक महेश पर्वत, ओबीसी आघाडी कार्यकारिणी सदस्य संतोष अंत्रे, सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंदे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला शरद पवारांचा मोठा धक्का, बड्या नेत्यांचा पक्षात प्रवेश
मराठ्यांना उभा देश चालवायचा, आरक्षण कुठे घेऊन बसलाय? संभाजी भिडे

आमदार तनपुरे म्हणाले, सोनगाव, सात्रळ, धानोरे पंचक्रोशीत विजेची समस्या व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले. कामे घेऊन आलेले पदाधिकारी कोणत्या पक्षाचे आहेत. याचा विचार न करता जनतेची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सोनगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये सन्मानाची वागणूक मिळेल, असेही तनपुरे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com