गणेश नाईक यांची अटकेपासून बचावासाठी न्यायालयात धाव
भाजप नेते गणेश नाईक (BJP Leader Ganesh Naik) यांच्यावर बलात्कार आणि धमकावण्यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नाईकांसोबत लिव्ह ईन मध्ये राहणाऱ्या दिपा चौहान (Deepa Chauhan) या महिलेने त्यांच्यावर हे आरोप केले आहेत. गणेश नाईक यांच्यावर या प्रकरणात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. महिलेने केलेल्या तक्रारदाखल पत्रानुसार, गणेश नाईक हे सदर महिलेसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे स्पष्ट होते. तसेच गणेश नाईक यांच्यापासून त्यांना एक मुलगाही आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, गणेश नाईकांच्या अटकेची शक्यता नाकारता येत नाही.
आता ह्याच प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये म्हणून गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. नवी मुंबई भागामध्ये गणेश नाईकांविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.