BJP vs NCP| हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा; राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजप नेते आक्रमक

BJP vs NCP| हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा; राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजप नेते आक्रमक

महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारा कडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला,राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुती मध्ये मिठाचा खडा पडला आहे.
Published by :
shweta walge
Published on

भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न करणाऱ्या हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले, महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारा कडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला,राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुती मध्ये मिठाचा खडा पडला आहे.

आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे सांगितले.हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहेत असा आरोप शिवराज घुले यांना यावेळी केला .

मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठविला विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर मध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्मास तिलांजली देणार असा इशारा आंदोलकांनी दिला. भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने महायुतीत मिठाचा खडा पाडलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com