Pankaja Munde
Pankaja Munde

मनोज हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर पंकजा मुंडेनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाल्या; "हाके आणि वाघमारे यांनी..."

सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज हाके यांनी आंदोलन स्थगित केलं आहे, पण थांबवलं नाही, अशी भूमिका मांडली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

मनोज हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी गेल्या दहा दिवसांपासून ओबीसी समाजासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज हाके यांनी आंदोलन स्थगित केलं आहे, पण थांबवलं नाही, अशी भूमिका मांडली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

आंदोलन स्थगित झालं आहे, आंदोलन थांबलं नाहीय. काही निश्चित काळात त्यांना या गोष्टींचं उत्तर मिळालं, तर त्यांचं समाधना होऊ शकतं. आरक्षण संवेधानिक चौकटीत आण कायद्याने घेतला जाणारा निर्णय आहे. पेपरवर काही लिहून आम्ही आरक्षणाच्या बाबतीत समाधानं नाही करू शकत. हाके आणि वाघमारे यांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरु केलं, त्यांच्या बोलण्यात समजूतदारपणा होता. त्यांनी या गोष्टींचा अभ्यास केला होता. चांगल्या सात्विकतेनं त्यांनी या विषयाची मांडणी केली आहे. कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही, असं आवाहनही आम्ही नेत्यांनी त्यांना केलं आहे.

सामान्य माणसांना समस्यांना सामोरं जावं लागेल, अशी भूमिका घेऊ नये, याबाबतही त्यांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे माझ्य नजरेत त्यांच्याबद्दलचा मान वाढला आहे. यापुढे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असं समाधान त्यांना मिळावं. दोन्ही आंदोलकांचे अभ्यासपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने काही लोकांसोबत चर्चा करावी.

त्यातून एक कॉमन ड्राफ्ट तयार झाला पाहिजे आणि कायद्याप्रमाणे त्या गोष्टीला सामोरं जाऊन त्यांचं समाधान केलं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही ते दिलं होतं. पण त्यानंतर ते टीकलं नाही. तसच मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. त्याचा लाभही त्यांना मिळत आहे. तरीही त्यांना आबोसीतून आरक्षण पाहिजे. त्यामुळे निश्चितच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com