ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. किरीट सोमय्या यांनी शनिवारी टि्वट करीत आपले नववर्षांचे संकल्प जाहीर केले होते. त्यानुसार या वर्षी (२०२३) मध्ये त्यांच्या टार्गेटवर कोण असणार यांची यादी त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत.
किरिट सोमय्यांनी व्हिडिओत काय म्हणाले?
व्हिडिओ ट्विट करत किरीट सोमय्या म्हणाले की उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात अनिल परब, हसन मुश्रीफ, अस्लम खान, किशोरी पेडणेकर यांच्या सदनिका आणि ठाकरे परिवाराचे १९ बंगले हे सगळे घोटाळे बाहेर काढणार. त्यानंतर ते आज तातडीने रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत.
ठाकरे परिवाराच्या १९ बंगल्यांचा हिशोब सुरू असं ट्विट
किरीट सोमय्यांनी नवीन वर्षी सकाळी ११.३० ला रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असाही इशारा दिला होता. असंही ट्विटही किरीट सोमय्यांनी केलं होतं. त्यानंतर ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले.