चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांवर हल्लाबोल, म्हणाले; "राजकारणी व्यक्तीनं देवेंद्र फडणवीसांवर आरोप..."
Chandrashekhar Bawankule On Anil Deshmukh : राज्याचे गृहमंत्री आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. पीएच्या माध्यमातून देशमुख पैसे घेत होते, असा आरोप वाझेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार गटातील लोक आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात एखाद्या अधिकाऱ्याने इतक्या गंभीर पद्धतीने आक्षेप घेतला आहे. पीएच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला आहे. नार्को टेस्ट करा, त्यासाठी मी तयार आहे, असं वाझे म्हणतात. मग अशावेळी कोणत्याही सार्वजनिक जीवनात राजकारणी व्यक्तीनं देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखांकडून नार्को टेस्टची अपेक्षा ठेवायची होती, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांना कोणतेही उपद्रव करण्याची गरज भासत नाही. त्यांचं काम नेहमी प्रामाणिक राहिलं आहे. शरद पवार गटातील लोक आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात एखाद्या अधिकाऱ्याने इतक्या गंभीर पद्धतीने आक्षेप घेतला आहे. पीएच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला आहे. नार्को टेस्ट करा, त्यासाठी मी तयार आहे, असं वाझे म्हणतात. मग अशावेळी कोणत्याही सार्वजनिक जीवनात राजकारणी व्यक्तीनं देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखांकडून नार्को टेस्टची अपेक्षा ठेवायची होती.
जर वाझेचं म्हणणं खोटं निघालं तर महाराष्ट्राला माहित होईल. वाझेंनी नार्टो टेस्टची तयारी दाखवली, तशीच भूमिका अनिल देशमुख यांनी घ्यायला हवी होती. हे जर सर्व खोटं असेल, तर अनिल देशमुख तुम्ही चौकशीला सामोरं जा. आरोप-प्रत्यारोप कशाला करत आहात? आरोप-प्रत्यारोपात महाराष्ट्राची जनता माफ करत नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपावर त्या प्रकरणाची चौकशी तातडीनं मागितली पाहिजे. आपल्यावर असलेला आरोप जाणार नाही. सार्वजनिक जीवनात आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, त्या दिल्या पाहिजेत.