मी येतोय, रोखून दाखवाच; किरीट सोमय्यांचे हसन मुश्रीफ यांना आव्हान
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी. कोल्हापूर आणि पुण्यात 2 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. जवळपास 20 अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल. साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने पहिली कारवाई केली आहे.माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घराबाहेर आज शांतता आहे. काल 12 तासाहून अधिक काळ ईडीकडून कारवाई सुरू होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ही कारवाई सुरू असताना मुश्रीफ समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले होते.
याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांना आव्हान दिले आहे. कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे. मागच्या वेळी माफिया सरकार होतं. त्यामुळे मला रोखलं गेलं होतं. आता मला तुम्ही रोखू शकत नाही. मी येत आहे. मुश्रीफ यांनी मला थांबवून दाखवावेच, असे किरीट सोमय्या म्हणाले.