“ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल
ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसाम सरकारने केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांच्यावर आरोप करण्यात येत आहे की, महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र ते पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी भाजपावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विट करुन म्हटले आहे की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….! श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील 'भीमाशंकर' जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते.अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरूय केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे. असे म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.
यावर प्रतिउत्तर देत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, “ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत? “या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? महाविकासआघाडी सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले.” असे म्हणत सुप्रिया सुळेंना त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.