भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच बैठकीनंतर भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावर प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक आहे. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी या ज्या सिटींग सीट आहेत आणि काही सीट आमच्याकडे ज्या मागच्यावेळी आम्ही लढल्या होत्या. आम्ही चांगल्या पद्धतीने फाईट केली होती. त्या सीटवर आम्ही चर्चा करणार आहोत. पण ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेजींच्या सीट आहेत, त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी तयारी करत आहेत. अजितदादांचं सीटींग आमदार तिकडे तयारी करत आहेत. त्याठिकाणी आम्ही चर्चा करणार नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महायुतीचं जवळपास जुळत आलं पण भाजप जिंकू शकते अशावर आम्ही चर्चा करु शकतो. केंद्रीय निवडणूक समिती आज बैठक घेणार आहे. त्या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक समिती ठरवतं की केव्हा लिस्ट आणि फॉर्म्युल्या जाहीर होईल. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.