भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून गोपीचंद पडळकर मैदानात

भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून गोपीचंद पडळकर मैदानात

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी मिळाली आहे. यादीतील 22 उमेदवारांची संपूर्ण माहिती येथे वाचा.
Published by :
shweta walge
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. देवयानी फरांदे, हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली आहे.

अकोल्यामधून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, पुण्यामध्ये खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे

ही आहेत भाजपची 22 नावे

  1. राम भदाणे- धुळे ग्रामीण

  2. चैनसुख संचेती – मलकापूर

  3. प्रकाश भारसाखळे – अकोट

  4. विजय अग्रवाल – अकोला पश्चिम

  5. श्याम खोडे – वाशिम

  6. केवलराम काळे – मेळघाट

  7. मिलिंद नरोटे – गडचिरोली

  8. देवराम भोंगले – राजुरा

  9. कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी

  10. करण देवताळे – वरोरा

  11. देवयानी फरांदे – नाशिक मध्य

  12. हरिश्चंद्र भोये -विक्रमगड

  13. कुमार आयलानी – उल्हासनगर

  14. रवींद्र पाटील – पेण

  15. भीमराव तापकीर – खडकवासला

  16. सुनील कांबळे – पुणे छावणी

  17. हेमंत रासने – कसबा पेठ

  18. रमेश कराड – लातूर ग्रामीण

  19. देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य

  20. समाधान आवताडे – पंढरपूर

  21. सत्यजित देशमुख – शिराळा

  22. गोपीचंद पडळकर – जत

दरम्यान, विशेष म्हणजे या यादीत मुंबईतील विधानसभा मतदारसंघातील नावे जाहीर केलेली नाहीत. मुंबईसह काही जागांवर महायुतीत चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे आता याबाबत महायुतीत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com