कोल्हापुरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं आंदोलन

कोल्हापुरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं आंदोलन

विधानसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक दौरे, बैठका घेण्यात येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा कालचा दौरा तांत्रिक कारणास्तव रद्द झाला होता. आज राहुल गांधी कोल्हापूरला येणार आहेत.

खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा होणार आहे. यासोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन राहुल गांधी अभिवादन करणार आहेत.

त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी राहुल गांधी काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राज्यातील काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याविरोधात कोल्हापूरात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. ताराराणी चौकात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com