काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक; नागपूरमध्ये भाजप करणार आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक; नागपूरमध्ये भाजप करणार आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यातील वडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यातील वडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान नाना पटोले यांनी शेगावचे गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पावसामुळे या ठिकाणी चिखल झाला होता. त्या चिखलात नाना पटोले यांचे पाय माखले गेले.

यावेळी एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले. हा पाय धुण्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ भाजप आंदोलन करणार आहेत.

नागपूरच्या नाना पटोले यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात येण्याची माहिती मिळत आहे. नाना पटोले यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com