Vidhan Parishad Election 2024 Result
Vidhan Parishad Election 2024 ResultLokshahi

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीत भाजपचा 'कमळ' फुलला! पाचही उमेदवार विजयी

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Vidhan Parishad Election 2024 Result : लोकसभेनंतर आता विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार योगेश टीळेकर विजयी झाले असून त्यांना २३ मतं मिळाली आहेत. तसच भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके यांचाही विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला आहे. पंकजा मुंडे आणि परिणय फुके यांना २६ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांना २४ मतं मिळाली असून या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. तर शेकापच्या जयंत पाटील यांचा परभव झाला. पाटील यांना ११ मतं मिळाली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांना २५ मतं मिळाली असून त्यांनीही या निवडणुकीत बाजी मारली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकरही विजयी झाले असून त्यांना २३ मतं मिळाली आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार

पंकजा मुंडे (विजयी) - २६

अमित बोरखे (विजयी) - २६

परिणय फुके (विजयी) - २६

सदाभाऊ खोत (विजयी) -

योगेश टीळेकर (विजयी) - २६

शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार

कृपाल तुमणे (विजयी) - २५

भावना गवळी (विजयी) - २४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट

शिवाजीराव गरजे (विजयी) - २४

राजेश विटेकर (विजयी) - २३

काँग्रेस

प्रज्ञा सातव - २५

शेतकरी कामगार पक्ष

जयंत पाटील (पराभूत) - १२

शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे)

मिलिंद नार्वेकर - विजयी

महायुतीला २४७ मतं मिळाली. राष्ट्रवादीला ४७ मतं मिळाली. शिवसेनेला ४९ पैकी ४९ मतं मिळाली. भाजपचे १०९ आमदार असताना त्यांना ११८ मतं मिळाली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com