BJP Leader on Aurangzeb Grave
BJP Leader on Aurangzeb GraveTeam Lokshahi

BJP पदाधिकारी औरंगजेबाच्या कबरीवर; काँग्रेसनं समोर आणला फडणीसांसोबतचा 'तो' फोटो

सचिन सावंत यांनी यावरुन एक सवाल उपस्थित केला आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : औरंगाबादमध्ये AIMIM पक्षाचे नेते अकबरुद्दी ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्या दौऱ्यानंतर राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे. ओवैसींनी एका कार्यक्रमासाठी हा दौरा केला होता. या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यापूर्वी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती (Aurangzeb Grave) माथा टेकवला. यामुळे राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला असून, त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. भाजपने (BJP) या प्रकरणावरुन शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडीवर देखील भाजपने टीका केली आहे. त्याला आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे.

BJP Leader on Aurangzeb Grave
Ketaki Chitale केतकीच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत, म्हणाले...
BJP Leader on Aurangzeb Grave
BJP Leader on Aurangzeb GraveTeam Lokshahi

सचिन सावतं यांनी याप्रकरणावर बोलताना सांगितलं की, "औरंगजेबाची कबर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मोदी सरकार प्रवेश नियंत्रित करु शकते वा बंदीही घालू शकते. मोदी सरकार ओवैसीविरोधात तक्रार का नोंदवत नाही?" असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. तसंच "भाजपाचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष खालीद बाबू कुरेशी फडणवीस साहेबांनी वर्णिलेले कार्य करताना पहा" असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजप नेते खालीद बाबू कुरेशी यांचा औरंगजेबाच्या कबरीवरील एक फोटो आणि फडणवीस यांच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

BJP Leader on Aurangzeb Grave
CM मला तुमच्याशी बोलायचंय | राज्यातील पोलिसांमध्ये का वाढतोय तणाव?

सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी, लालकृष्ण अडवाणी यांचा एक फोटो शेअर केला होता. "औरंगजेबाच्या कबरीवर ओवैसी गेले तर बोंब ठोकून कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपाने व भाजपाच्या पिट्टूंनी आधी 'जीना'च्या कबरीवर गेलेल्या अडवाणींवर कोणत्या IPC च्या कलमानुसार कारवाई केली? भाजपाचे सहयोगी नितीशकुमारांनाही जेलमध्ये का टाकले नाही? यांचे उत्तर द्यावे.अजून देश संविधानाने चालतो" असं मत सचिन सांवत यांनी व्यक्त केलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com