Lokshahi Marathi Mega Exlusive : अभिषेक घोसाळकर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; CCTV फुटेज आले समोर
अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली त्यावेळी मॉरिसच्या ऑफिस परिसरात अभिषेक आणि मॉरिस यांच्या व्यतिरिक्त तिसरा माणूस असल्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती आली आहे. अभिषेक यांच्या हत्येच्या दोन मिनिटं आधी मेहुल पारेख नावाची व्यक्ती त्या परिसरात होती. मेहुल हा मॉरिसचा मित्र आहे.
मॉरिसनं हत्येआधी मेहुल ऑफिस परिसरातून निघाला होता. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा तिथल्या गोंधळात मेहुल रिक्षातून निघून जात असल्याचं दिसत आहे. 8 फेब्रुवारीला जेव्हा गोळीबार झाला तेव्हा लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार यांनी मेहुलची फोनवरुन प्रतिक्रिया घेतली होती. त्यावेळी मेहुलनं घटनास्थळी नव्हतो असं सांगितलं होतं.
दरम्यान, सीसीटीव्हीत मेहुल मात्र घटनास्थळी दिसतो आहे. मुख्य बाब म्हणजे पोलिसांनी मेहुलला ताब्यात घेतलं आणि त्याला सोडूनही दिलं. त्यामुळं पोलीस तपासावर घोसाळकर समर्थकांकडून प्रश्नचिन्हं निर्माण केलं गेलं आहे. मेहुल पारेख हा मॉरिसचा जुना साथीदार असल्याची माहिती आहे. मेहुल आणि मॉरिसचे अनेक फोटो आणि व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागले आहेत.