ताज्या बातम्या
मोठी बातमी! सरकारने महागाई भत्त्यात 4 नव्हे तर एवढ्या टक्क्यांची केली वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना 42 टक्के डीएचा लाभ दिला जात आहे. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. तसेच आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 8 टक्के करण्यात आला आहे. ही वाढ गुजरात सरकारने केली आहे.
पहिली वाढ 1 जुलै 2022 पासून करण्यात आली आणि त्यात 4 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे 4 टक्के वाढ झाली आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांचा एकूण डीए 8 टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे आता राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले.