सर्वात मोठा आगमन सोहळा! चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा आज आगमन सोहळा, चिंतामणी कोणत्या रूपात दिसणार?

सर्वात मोठा आगमन सोहळा! चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा आज आगमन सोहळा, चिंतामणी कोणत्या रूपात दिसणार?

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मुंबई परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मुंबई परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन होत आहे. या आगमन सोहळ्यात सर्वांना वेध लागले असते आगमनाधीश चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची. विशेष म्हणजे, चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. या सोहळ्याला दरवर्षी लाखो गणेश भक्तांची उपस्थिती असते. ढोल-ताश्याच्या गजरांमध्ये आणि भक्तांच्या जयघोषामध्ये हा सोहळा पार पडतो. त्यामुळे हा सोहळा मुंबईतील गणेशोत्सवाची वेगळी ओळख झाला आहे.

भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं या वर्षीचा आगमन सोहळा शनिवार 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2:00 वाजता गणेश टॉकीज, चिंचपोकळी येथून होणार असून यावर्षी चिंतामणी कोणत्या रूपात दर्शन देणार आहे याची उत्सुकता चिंतामणी भक्तांना लागून राहिली आहे.

मूर्तिकार विजय खातू, मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या संकल्पनेतून चिंचपोकळीचा चिंतामणी साकार होत आहे. यावर्षीच्या आगमन सोहळ्यात कलेश्वरनाथ, सोनू मोनू बिट्स, कामतघर -खोणी ब्रास बँड, भिवंडी गांव, जोगेश्वरी बिट्स, सातरस्ता बिट्स, श्रीगणेशनाद वाद्य पथक पुणे, यांचे वादन होणार आहे. आगमन सोहळ्याचे अजून एक आकर्षण म्हणजे मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे, प्रो गोविंदा विजेते ‘जय जवान गोविंदा पथक’ चिंचपोकळीच्या चितांमणीला मानवी थरांची सलामी देणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com