Pooja Khedkar: मोठी बातमी! दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा

Pooja Khedkar: मोठी बातमी! दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा

पुण्यामधील वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनाचा फैसला झाला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पुण्यामधील वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनाचा फैसला झाला. पूजा खेडकर यांच्या अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे होते. याआधी पूजा खेडकर यांना कोर्टाने दोन वेळा अटके पासून तात्पुरता दिलासा दिला होता. याबाबत कालच पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात रिजॉईंडर दाखल केले आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूडा खेडकरच्या अडचणींमध्ये सातत्यानं वाढ होत असतानाच आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देत महत्त्वाची सुनावणी केली आहे. पूजा खेडकरला न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला असून, या निर्णयानुसार खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारी अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय सुनावला.

या रिजॉईंडरमध्ये पूजा खेडकरने युपीएससीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. UPSC च्या आरोपात तथ्य नसल्याचे पूजा खेडकर यांचे म्हणणे आहे. पूजा खेडकरने नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप UPSCने केला होता. मात्र नाव बदलल्याची माहिती यापूर्वीच UPSCकडे दिली असल्याचे पूजा खेडकरने रिजॉईंडरमधे स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com