शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत मोठी बातमी; CCTV मध्ये...
8 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व राज्यातील सर्वात मोठ्या राजकीय नेत्यांपैकी एक शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) ह्यांच्या मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) ह्या निवासस्थानी ST कर्मचाऱ्यांनी दगडफेक व चप्पलफेक केल्याने राज्यभरात एकच धांदल उडाली. दरम्यान, ह्या प्रकरणाबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
सदावर्तेंना अटक:
ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte Arrested) ह्यांना 8 तारखेलाच सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काल (09-04-2022) सदावर्तेंना न्यायालयाने 2 दिवसांची कोठडी सुनावली.
आझाद मैदानावरील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले:
दरम्यान, ह्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी व आरोपींना कठोर शासन करावे असे निर्देश थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दिल्यामुळे पोलिसांच्या तपासाला वेग मिळाला. तपासादरम्यान, आझाद मैदानावरील (Aazad Maidan) सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. तर, सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.