मनसेचा दणका! शिवसदन सोसायटीचा इंग्रजीतला फलक मराठीत

मनसेचा दणका! शिवसदन सोसायटीचा इंग्रजीतला फलक मराठीत

मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला शिवसदन इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. यावरुन मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली.
Published by :
shweta walge
Published on

मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला शिवसदन इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. यावरुन मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली. तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारण्यात आलेल्या शिवसदन सोसायटीचा इंग्रजीतला फलक मनसेच्या दणक्यानंतर मराठीप्रेमींच्या सूचनेनंतर बदलण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड यांनी काल या सोसायटीचा फलक मराठीत करण्यास सांगितला होता, तो आज बदलला आहे. तसेच गुजराती भाषेत या परिसरात असलेल्या फलकांवर त्यानी काळ्या अक्षरात मराठी लिहून निषेध नोंदवला आहे.

मनसेचा दणका! शिवसदन सोसायटीचा इंग्रजीतला फलक मराठीत
आगामी लोकसभेसाठी मविआचा फॉर्मुला ठरला? अशी असेल रणनीती

सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड म्हणाले, मराठी भाषेसाठी प्रत्येक मराठी माणसाने आवाज उठवला पाहिजे. मुंबईमध्ये जाणून बघून गुजराती भाषेत बोर्ड लावले जातात. त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने मुलुंडमधील एका इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो तुफान व्हायरल झाला. तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com