loudspeakers on mosque
loudspeakers on mosqueTeam Lokshahi

मुंबई पोलिसांचा भोंग्यांसंदर्भात मोठा निर्णय

येणाऱ्या काळात ही कारवाई वेगाने करण्याची शक्यता आहे.
Published by :
Vikrant Shinde
Published on

मागील काही दिवस राज्याचं राजकारण हे धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांभोवतीच (Loud Speakers) फिरत असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात अनेक ठिकाणची परिस्थिती ही ह्याच मुद्द्यावरून संवेदनशील झालेलीही पाहायला मिळतेय. त्यात आता मुंबई पोलिसांकडून भोंग्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

loudspeakers on mosque
औरंगाबादकरांनो मेसेज शेअर करताना सावधान! राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज

काय आहे मुंबई पोलिसांचा निर्णय?

मुंबईत रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊडस्पीकरला बंदी घालण्यात आलीय. सायलेंट झोनमधील धार्मिक स्थळांनाही यापुढे भोंग्याची परवानगी नसणार आहे, यापुढे अनिधकृत भोंग्याविरोधात पोलीस (Mumbai Police) कारवाई करतील.

नेमकी काय कारवाई केली जाणार?

अनिधकृत भोंग्या संदर्भात मुंबई पोलीस आता थेट कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. CrPC कलम 144, 149 आणि 151 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात ही कारवाई वेगाने करण्याची शक्यता आहे. तर, दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com