उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं

‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हं शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे यासंदर्भातील निर्णय आज लागला आहे.
Published by :
shweta walge
Published on

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. आज निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची घोषणा केली आहे. शिवसेना हे पक्षाचं नावही दोन्ही गटांना सध्या धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडेपर्यंत दोन्ही गटांना हे निर्बंध लागू असणार आहेत.

‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हं शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे यासंदर्भातील निर्णय आज लागणार होता. निवडणूक आयोगासमोर सुरु असणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. मुंबईमधील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील हक्कासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वाद सुरु होता. मात्र आता निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com