प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा! राजकीय पक्षांची भूमिका काय?

प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा! राजकीय पक्षांची भूमिका काय?

आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच राज्यात वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत.
Published by :
shweta walge
Published on

आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच राज्यात वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी ही घोषणा केली आहे.

प्रकाश आंबेडकर राज्यात आता एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. या यात्रेला 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात होणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. यानंतर ७ किंवा ८ ऑगस्टला तारखेला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर येथे सांगता होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“काही लोक नामांतराची आठवण करून देत आहेत. दोन गट पडले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. काय स्वरुप होईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि नेत्यांना आहे. जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलनाची सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यात सामंजस्याचा तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यात एनसीपी आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे आणि उद्धव ठाकरे गट आहे. हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत तोडगा निघणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“सऱ्या बाजूला या बैठकीत मुख्यमंत्र्यांना वंचितकडून विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी या राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं. या प्रश्नावर म्हणजे जरांगे यांची जी मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही मागणी आहे, त्याबाबत राजकीय पक्षांची भूमिका काय आहे, त्याची विचारणा करून मग समान तोडगा काढता येईल. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की पत्र पाठवू. अजून पर्यंत वंचित आघाडीला ते पत्र मिळालं नाही. इतर पक्षांना मिळालं का याचा आमच्याकडे खुलासा नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com