Manoj Jarange Beed Sabha: मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मुंबईत 'या' दिवसापासून आमरण उपोषण

Manoj Jarange Beed Sabha: मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मुंबईत 'या' दिवसापासून आमरण उपोषण

मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा उद्या म्हणजेच 24 डिसेंबरला संपणार आहे. त्याआधीच जरांगे पाटलांनी बीडच्या सभेत मोठी घोषणा केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा उद्या म्हणजेच 24 डिसेंबरला संपणार आहे. त्याआधीच जरांगे पाटलांनी बीडच्या सभेत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे आमरण उपोषण करणार असून आता मोर्चा थेट मुंबईकडे येणार आहे. मुंबईमध्ये 20 जानेवारीला आझाद मुंबईवर उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

ते म्हणाले की, सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

अंतरवाली हून मराठ्यांचा जनसागर मुबंईला जायचं आहे. कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं. कुणाला जाळपोळ करु द्यायची नाही. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. २० तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा. मी मेलो तरी चालेल मागे फिरणार नाही.

मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com