कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी गेले. याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न झालं आहे.

नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन आज पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते पार पडलं. 8 ऑगस्टला अचानक लागलेल्या आगीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं होतं.

सभागृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडून 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून दीड वर्षात नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी होऊन नाट्यगृह पुन्हा सेवेत आणण्याचा प्रयत्न असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com