भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वंजारपट्टी नाक्यावर मिरवणुकीवर दगडफेक

भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वंजारपट्टी नाक्यावर मिरवणुकीवर दगडफेक

भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिजीत हिरे, भिवंडी

भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे. भिवंडीत वंजारपट्टी नाक्यावर विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी विसर्जन दुपारी तीन वाजता पासून भिवंडी शहरात शांततेत सुरू झाली होती.

त्यानंतर रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणूक वंजारपट्टी नाका परिसरात आली. गणपती विसर्जन मिरवणूकीवर दगडफेक करण्यात आली. अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

तणाव वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक जखमी असून जमावाकडून झालेल्या दगड फेकीत एक पोलीससुध्दा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com