भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला प्रकरण;  परिसरातील CCTV फुटेज पोलिसांच्या ताब्यात
Team Lokshahi

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला प्रकरण; परिसरातील CCTV फुटेज पोलिसांच्या ताब्यात

आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला प्रकरण
Published by :
shweta walge
Published on

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

जाधव यांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या पाग येथील श्री सुकाई देवी मंदिर व एका केश कर्तनालायच्या दुकानाबाहेर असलेला सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या शोध घेण्यासाठी हे फुटेज उपयोगी पडण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त होत आहे. तसेच आज चिपळूण पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवले असल्याची माहिती पुढे येत आहे.त्याच बरोबर आठ संशियाती याचे जबाब घेण्यात आले तर सी डि यार मागविण्यात आले आहे. त्याचबरोबर परिसरातील पेट्रोल पंप ,हॉटेल याठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करण्यात येत आहे.

तसेच काल रत्नागिरी पोलिसांनी डॉग स्क्रोड कडून जाधव यांच्या घर व परिसर याची रेखी केली होते. ते डॉग स्क्रोड 50 मीटर अंतरावर जाऊन थांबले असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सदरच्या प्रकरणाचा छडा लवकच लागणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com