पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर भारती पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली. या सभेच्यावेळी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना एका तरुणाने कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी केली. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
यावर आता भाजप नेत्या भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारती पवार म्हणाल्या की, संबंधित व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाची आहे, कुठल्या पदावर आहे. आणि जर असं आहे तर ही लोकशाही आहे. तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे. आम्ही जशी भूमिका आमच्या स्टेजवर मांडतो आहे. आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही प्रामाणिकपणे जनतेसमोर ठेवतोय.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवण्याचे काल निदर्शनास आलं. विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाही आहे. विरोधकांनी अशाप्रकारचे गलिच्छ राजकारण केलं आहे. की त्यांच्याच पदावर असलेलं लोक जर अशाप्रकारचे प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा पण वापर करावा ना. असे भारती पवार म्हणाल्या.