Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Route
Bharat Jodo Yatra Rahul Gandhi RouteTeam Lokshahi

भारत जोडो यात्रा 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

कमलाकर बिरादार : नांदेड | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. नवा मोंढा येथे सभा होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Route
नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या बसने घेतला पेट

8 नोव्हेंबरला शरद पवार नांदेडमध्ये मुक्कामी येणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी नायगाव येथे ते पदयात्रेत सहभागी होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह वकील, डाॅक्टर तसेच समाजसेविका मेधा पाटकर देखील यात्रेत सहभागी होणार आहे.

असा असणार यात्रेचा महाराष्ट्र दौरा

120 किलोमीटरची पदयात्रा नांदेड जिल्ह्यात यात्रेचा चार दिवस मुक्काम असेल. पदयात्रेनंतर काॅर्नर मीटिंगदेखील होतील. 10 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये नवा मोंढा येथे दुपारी साडेचार वाजता जाहीर सभा होणार आहे. राज्यात या यात्रेचा मार्ग तीनशे किमी आहे.

त्यानंतर हिंगोलीत चार दिवस यात्रेचा मुक्काम राहणार असून यादरम्यान महाराष्ट्रात दोन जाहीर सभा होणार आहेत. पैकी एक नांदेडमध्ये तर दुसरी शेगावला. दररोज 24 किलोमीटरची यात्रा सकाळी सहा वाजता सुरू होईल. 12 किलोमीटरनंतर विश्रांती आणि नंतर दुपारी साडेतीन ते सात असा कार्यक्रम असेले.

दरम्यान या यात्रेविषयी बोलताना चव्हाण म्हणाले, एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. बेरोजगारी, महागाई, दडपशाहीसारख्या मुद्द्यांवर लोक स्वतःहून राहुल गांधींकडे व्यथा मांडत आहेत. केवळ काँग्रेसचीच ही यात्रा नाही तर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचा या यात्रेत सहभाग आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com