भंडारा जिल्ह्यातील एसटी सेवा सुरुळीत

भंडारा जिल्ह्यातील एसटी सेवा सुरुळीत

एसटी कर्मचाऱ्यांकडून आजपासून आंदोलन करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सरवर शेख, भंडारा

एसटी कर्मचाऱ्यांकडून आजपासून आंदोलन करण्यात येणार आहे. आज एस टी कृती संघटना समितिच्या वतीने विवीध मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे.

एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची त्यांची मागणी आहे. तसेच 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी,शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ, 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी अशा त्यांच्या मागण्या आहेत.

राज्यातील एस टी सेवा ठप्प झाली आहे. पण भंडारा जिल्ह्यातील एसटी सेवा सुरुळीत असलेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व आगारातून एसटी सेवा सुरू आहे. भंडारा आगारातून ठराविक अंतराने एसटी सुरू आहेत. तान्हा पोळा, मारबत असल्याने प्रवाशांची गर्दी कमी आहे. राज्यभरात एसटी बंद असताना भंडारा जिल्ह्यातील एसटी सेवा मात्र सुरळीत सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com