राज्यात भारनियमन, पंजाबमध्ये ३०० युनिट मोफत वीज

राज्यात भारनियमन, पंजाबमध्ये ३०० युनिट मोफत वीज

Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्रात महाविकास आघाडी (mahavikas aghadi)सरकारकडून भारनियमन (load shedding)केले जात असतांना पंजाबमधील आप (aap)सरकारने नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यातील नागरिकांना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा आप सरकारने केली आहे. आपच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनानुसार नागरिकांना प्रत्येकी ३०० युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय आता पंजाब सरकारने (panjab goverment)जाहीर केला आहे. त्यानुसार, १ जुलैपासून राज्यातील नागरिकांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. cm bhagwant mann announces 300 units of free power for households

राज्यात भारनियमन, पंजाबमध्ये ३०० युनिट मोफत वीज
मुंबईत दोन रेल्वे समोरासमोर, अपघात कसा झाला पाहा फोटोमधून

आप सरकारकडून दिल्लीत २०० युनिट वीज मोफत दिली जाते तर पंजाबमध्ये मोफत वीज देण्यासंदर्भात भगवंत मान यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर १ जुलैपासून मोफत वीज दिली जाणार आहे. खरं तर पंजाबमध्ये मे-जून मध्ये धानची लागवड केली जाते. यामुळे १ जुलैपासून मोफत वीज देण्याचा निर्णय अलिकडे घेतला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात भारनियमन

राज्यातल्या विजेच्या प्रकल्पांची निर्मिती क्षमता ९३०० मेगावॅट आहे पण कोळसा टंचाई असल्यामुळे ६५०० मेगावॅट विजेची निर्मिती सुरू आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. राज्यातल्या 24 हजार 200 पैकी 1300 संचयकांवर तीन तासांपर्यंतचं भारनियमन सुरू झालंय. वीजगळती अधिक असलेल्या भागांत सध्या भारनियमन सुरू आह़े. वीजेअभावी ग्रामीण भागांत पिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आह़े त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना याच्या तीव्र झळा बसतायत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com