Best Bus Strike : अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संप मागे

Best Bus Strike : अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संप मागे

अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांची काल मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. 7 दिवसानंतर बेस्टचा संप मागे घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्याने हा संप मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आझाद मैदानात एकत्र येत हा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल आश्वासन दिले होते. त्यामुळे बेस्ट कंत्राटी कामगारांनी संप मागे घेतला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या मध्यस्थीने आम्ही आलो. साहेबांची भेट घालून दिली त्यांच्या मागण्या सांगितल्या. बेसीकमध्ये वाढीची मागणी होती. तिथे भरघोस वाढ मिळण्याचे मान्य केले आहे.

दिवाळी बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वाढ मान्य केली आहे. येण्या जाण्याचा पास मोफत दिला जाणार आहेत. आंदोलन केले म्हणून कारवाई केली जाणार नाही. निवृत्त लोकांना सेवेत घेतले जाणार नाही. असे सचिव महाराष्ट्र राज्य कामगार संघटना यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मान्य झालेल्या मागण्या...

बेसिक पगारात होणार वाढ

वार्षिक रजा भर पगारी मिळणार

दिवाळी बोनस मिळणार

साप्ताहिक रजा मिळणार

वार्षिक वेतनवाढ मिळण्याची शक्यता

कामावर येण्याजाण्यास मोफत पास

संपा दरम्यानचा गेल्या आठ दिवसांचा पगार मिळणार

आंदोलनकर्त्यांवर कारवाई होणार नाही

निवृत्त कामगारांना प्राधान्य न देता तरुणांना प्राधान्य मिळणार

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com