26 तासांच्या चौकशीनंतर ममता बॅनर्जीच्या मंत्र्यास अटक, निकवर्तींकडे मिळाली 20 कोटींची रोकड
Partha Chatterjee Arrested: पश्चिम बंगाल शिक्षण घोटाळा प्रकरणात आता मंत्रीपर्यंत तपास पोहचला आहे. या प्रकरणात ममता बॅनर्जीचे सहकारी आणि मंत्री पार्थ चटर्जीला 26 तासाच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. तसेच पार्थ यांचे निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीलाही ED ने अटक केली आहे. पार्थ चटर्जीला अटकेपुर्वी प्रकृती खराब झाल्याचे कराण दिले. परंतु त्यांना अटक करुन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
पश्चिम बंगाल के शिक्षा घोटाले में ममता बनर्जी के नेतृत्व वाली सरकार में मंत्री पार्थ चटर्जी को गिरफ्तार कर लिया गया है. इसके साथ ही उनकी करीबी बताई जा रहीं अर्पिता मुखर्जी को भी ED ने हिरासत में ले लिया है. ईडी के अधिकारी फिलहाल उनसे पूछताछ कर रहे हैं. वहीं पिछले 26 की पूछताछ के बाद ED ने पार्थ चटर्जी को गिरफ्तार कर लिया है.
शनिवारी सकाळी पार्थ चॅटर्जी यांनी प्रकृती खालावल्याचे सांगितले. यानंतर दोन डॉक्टरांचे पथकही उपचारासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पार्थ चॅटर्जीला अटक केल्यानंतर मेडिकलसाठी नेण्यात येत आहे. पार्थला कोलकाता येथील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये नेण्यात येईल. अर्पिता व्यतिरिक्त ईडीने इतर अनेक ठिकाणी छापे टाकले होते. या यादीत माणिक भट्टाचार्य, आलोक कुमार सरकार, कल्याण मोय गांगुली यांसारख्या नावांचा समावेश आहे. बंगालच्या शिक्षण भरती घोटाळ्यात या सर्वांचे कनेक्शन समोर आले. मात्र सर्वात मोठी कारवाई अर्पितावर करण्यात आली आहे, जिच्या घरी 20 कोटींची रोकड सापडली आहे.
अर्पिता मुखर्जीच्या घरात 20 कोटी
पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर शुक्रवारी ईडीने छापा टाकला आहे. अनेक तास चाललेल्या छाप्यात ईडीने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या कारवाईचे चित्र समोर आल्याने नोटांचा मोठा डोंगर पाहायला मिळत आहे.
माहितीसाठी, बंगाल एज्युकेशन रिक्रूटमेंट घोटाळा प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. अर्पिताच्या विरोधात ईडीला काही सबळ पुरावे मिळाले, त्यानंतर तिच्या घरावर छापा टाकण्यात आला. काही तासांच्या छाप्यांमध्ये नोटांचा ढिगारा समोर आला आहे. तरीही तपास यंत्रणा त्याच्या घरी हजर आहे.