Beed: राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु प्रदर्शनातील सोन्या आणि मोण्याची बैलजोडी ठरत आहे शेतकऱ्यांचे आकर्षण

Beed: राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु प्रदर्शनातील सोन्या आणि मोण्याची बैलजोडी ठरत आहे शेतकऱ्यांचे आकर्षण

बीडच्या परळीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याच कृषी प्रदर्शनातील पशु प्रदर्शन देखील शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

विकास माने | बीड: बीडच्या परळीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याच कृषी प्रदर्शनातील पशु प्रदर्शन देखील शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत आहे. परळीमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून पाच दिवसीय कृषी प्रदर्शन भरविण्यात आले. परंतु शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता आणखी एक दिवस प्रदर्शनाचा वाढविण्यात आला. सोमवारी या कृषी प्रदर्शनाची सांगता होणार आहे.

आतापर्यंत एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे. याच कृषी प्रदर्शनात पशुसंवर्धन विभागामार्फत पशु प्रदर्शन भरवण्यात आले. राज्यातील विशेष आणि आकर्षक पशु धन या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. यात 13 गाई, 6 म्हशी, 4 घोडे, 8 श्वान आणि विशेष आकर्षण म्हणजे बारामती येथील सोन्या आणि मोन्याची बैलजोडी, सोन्या आणि मोन्याची ही बैल जोडी शेतकऱ्यांचं विशेष आकर्षण ठरत आहे.

शेतकरी या पशु प्रदर्शनातून पशुधनाची माहिती घेऊन पशुधन जोपासण्याचा निर्णय घेतो आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरत असून असे प्रदर्शन भरवणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com