बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू

बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू

मनोज जरांगे पाटील यांचं सहाव्यांदा उपोषण सुरु आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वसीम अत्तार, सोलापूर

मनोज जरांगे पाटील यांचं सहाव्यांदा उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून, आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे.

याच पार्श्वभूमीवर बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू केलं असल्याचे पाहायला मिळत आहे. अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून उपोषण सुरू करण्यात आलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बार्शीतील तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरु असून आनंद काशीद यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये डोक्यावरती उलट उभा राहून उपोषण केलं असल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com