हिंगणघाटात झळकले 'असफल मोदीजी की कहाणी'चे बॅनर
भूपेश बारंगे,वर्धा:
मोदी सरकारचे नऊ वर्ष पूर्ण झाल्याने देश्यात मोदी@9 चा कार्यक्रम घेतला जात असताना यातून मोदींनी केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी भाजप पक्षाकडून कार्य केले जात असताना वर्ध्यातील हिंगणघाट शहरात चौकाचौकात 'असफल मोदीजी की कहाणी' बॅनर लावण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. चौकाचौकात बॅनर झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
हिंगणघाट शहरात चौकाचौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणाचा उल्लेख केल्याची माहिती लिहण्यात आली आहे. यातील एकही घोषणा पूर्ण झाली नसून मोदीजी असफल ठरल्याचे दर्शविले आहे.हे बॅनर कोणी लावले याबाबत अद्यापही कोणाला माहिती नसली तरी या बॅनरची मात्र शहरात जोरदार चर्चा आहे.
बॅनर वरचा उल्लेख!
2022 तक किसानो की इनकम दुगणी कर दूगां, देश से आतंकवाद खत्म कर दुगां, महागाई कम कर दुगां, 100 दिन मे काला धन वापस लाऊगां, भारत की एकॉनॉमी को 5 ट्रीलियन डॉलर कर दुगां, पेट्रोल डिझेल सस्ता करुंगा,2 करोड युवाओ को रोजगार दुगां, हर खाते मे 15 लाख डालुगां, डॉलर के मुकाबले रुपया मजबूत होगा, 2022 तक 100 स्मार्ट सिटी बनाऊगां, 2022 तक हर भारतीय को पक्का मकान दूगां, 2022 तक गंगा को साफ कर दुगां, गॅस सिलेंडर दाम कम कर दूगां असे या बॅनर मध्ये उल्लेख केल्याचे स्पष्ट दिसत आहेत.