हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाआधी इंदापुरात जोरदार बॅनरबाजी

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाआधी इंदापुरात जोरदार बॅनरबाजी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. यातच राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

इंदापूर मधील मार्केट कमिटीच्या आवारात हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती मिळत असून सकाळी दहा वाजता शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे.

हा पक्षप्रवेश झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत असून यावेळी हर्षवर्धन पाटील काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाआधी इंदापुरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

बॅनरवर हर्षवर्धन पाटील यांचा भावी मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रवेश सोहळ्याच्या प्रवेशद्वाराजवळच ही बॅनरबाजी करण्यात आली असून या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com