'ऑनलाइन आणि टीव्हीवर येणाऱ्या जुगाराच्या जाहिरातींवर बंदी घाला'
प्रसाद पाताडे, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे ऑनलाईन जुगारासह जिल्ह्यात टिव्ही वर येणाऱ्या ऑनलाईन रमी विषयक जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी करत, तसे न झाल्यास २६ जानेवारी पासून बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा जिल्ह्यातील समाजसेवक सदानंद सावंत यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणात वाढत असून यात तरुण पिढीचा सहभाग मोठा आहे. मटका, जुगार, दारू यात तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. शिवाय टीव्ही वर येणारी ऑनलाईन रमी जुगार जाहिरात तरुण पिढीला जुगार व्यवसायात ओढत आहे. तसेच जिल्ह्यात अवैध धंदे सुसाट सुरू असतानाही त्याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद व्हावेत, ऑनलाईन जुगारा वर बंदी घालावी तसेच टिव्ही वर येणाऱ्या ऑनलाईन रमी विषयक जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी समजसेवक सदानंद सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकड़े निवेदनाद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे हे अवैध धंदे बंद न झाल्यास २६ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.