नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य; बाळासाहेब थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र
Admin

नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य; बाळासाहेब थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र

नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान अनेक गोंधळ पाहायला मिळाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान अनेक गोंधळ पाहायला मिळाला. याचसर्व पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. विधानपरिषद निवडणूक दरम्यान जे काही घडलं, जे राजकारण झालं ते व्यथीत करणारं होतं. असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

थोरात म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत राजकारण झालं. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली. माझ्या विषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी थोरातांनी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचं विजयाबद्दल अभिनंदन  देखिल केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com