Balasaheb Thorat : पेपरफुटी विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे
पेपरफुटीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहेत. प्रत्येक परीक्षेत घोटाळे होत असल्याचा विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. पेपरफुटीबाबत कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलं आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, पेपरफुटी रोखण्यासाठी काय कारवाई करणार? दोषींना काय शासन केले? भरती प्रक्रिया कधी सुरळीत होणार? पेपर फुटी विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. मध्यंतरीच्या काळात तलाठी भरती साठी परीक्षा घेण्यात आली, मात्र या परीक्षेत आहे त्या मार्कांपेक्षा जास्त मार्क विद्यार्थ्यांना मिळत आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यात अनेक जण सहभागी आहे. त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, अनेक तरुण खूप कष्ट करून अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, मात्र काही जणांना अशा प्रकारचे जास्तीचे मार्क मिळतात हा मोठा अन्याय आहे. नीट परीक्षेसारख्या महत्त्वाच्या परीक्षेतही आशा बाबी घडल्या. देश पातळीवर ही घटना अत्यंत गंभीर आहे व विचार करायला लावणारी आहे. सरकारमध्ये आता अनेक विभागांमध्ये लाखो रिक्त जागा असून याबाबत कोणतीही भरती होत नाही व जी भरती होते त्यातही मोठ्या प्रमाणावर घोटाळे होतात यावर सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे आणि हे घोटाळे कधी थांबणार? काय कारवाई करणार? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला? असे बाळासाहेब थोरात म्हणाले.